बाईक वरून जाताना
मोठ्याने शीळ घालत
अथवा गाणी म्हणत,
अंगावर बारीकशी धूळ उडू नये आणि
जमलच तर दिखावुपणा
म्हणून परिधान करतो ..
आम्ही महागडी जाकेटस , टोप्या !
पण त्याच वेळी .. समोर धुळीने माखलेला लाल बावटा
घेउन उभा असणारा एक छोटा मुलगा
जेंव्हा.. त्याचा खेळ बाजूला ठेवुन ..
दिशा दाखवतो तेंव्हा
उन्हातान्हात सतत कष्ट करून
आपल्याकरता रस्ता
तयार करणाऱ्या या लोकांकरता माझा हात
आपोआपच टाळी देण्याकरता पुढे येतो !
एका ठिकाणी ते कधीच थांबणार नाहीत ...
त्यांचा प्रवास चालुच.. असतो ....अखंड ....उन्हापावसात
अश्वत्थाम्याप्रमाणे ते चिरंजीव आहेत की काय ..
आणि म्हणून आपण जिवंत आहोत की काय !!
For Leh Ladakh !
मोठ्याने शीळ घालत
अथवा गाणी म्हणत,
अंगावर बारीकशी धूळ उडू नये आणि
जमलच तर दिखावुपणा
म्हणून परिधान करतो ..
आम्ही महागडी जाकेटस , टोप्या !
पण त्याच वेळी .. समोर धुळीने माखलेला लाल बावटा
घेउन उभा असणारा एक छोटा मुलगा
जेंव्हा.. त्याचा खेळ बाजूला ठेवुन ..
दिशा दाखवतो तेंव्हा
उन्हातान्हात सतत कष्ट करून
आपल्याकरता रस्ता
तयार करणाऱ्या या लोकांकरता माझा हात
आपोआपच टाळी देण्याकरता पुढे येतो !
एका ठिकाणी ते कधीच थांबणार नाहीत ...
त्यांचा प्रवास चालुच.. असतो ....अखंड ....उन्हापावसात
अश्वत्थाम्याप्रमाणे ते चिरंजीव आहेत की काय ..
आणि म्हणून आपण जिवंत आहोत की काय !!
For Leh Ladakh !
No comments:
Post a Comment