Saturday, April 27, 2013

मन माझं सैरभैर ….


आणि


आठवणींचे काही तुकडे …



तुझं नसणं


आणि


चुकलेला सिक्वेन्स



तुझं भान


आणि


माझा जगणं संपल्यात जमा

Wednesday, April 24, 2013

तुझा गजरा इथेच विसरून गेलीस तू

फुले जपून ठेवली आहेत मी


कधी तरी आपल्या गाठी सुटतीलच ना ? !

आईला मोगरा खुप आवडायचा


म्हणुन काही फुले तिच्या थंडगार डोक्यावर तर काही


पायाशी वाहीली 


ओटीतली फुले ही मोगरयाचीच 


म्हणजे नक्कीच माझ्याजवळची राख मोगरयाचीच 


आईला मोगरा खुप आवडायचा

Sunday, April 21, 2013

रातभर थंडी हवा बहती रही 

हात मै चिठ्ठी लेके ....

सुबह से रात तक

उसकी राह देखते खडे थे दरवाजे पे

चांद ओर मै.... |

ना उसकी खबर आई 

ना उसके आने की आहट सुनाई दी ..

सुबह जमीन पे 

बुझती राख मै ढूंढता रहा उसके



लम्हो के निशां 
......
रात भर थंडी हवा बहती रही ...|

Saturday, April 20, 2013

घर की चार दीवारें खामोश थी रात भर |
रोज मेरी आंखो में रहने वाली नींद
धुंढती रही रात भर |
मां के हातो से लगाया हूवा मोगरा
चील्लाता रहा रात भर |
बाजू वाले कमरे में भुखा बच्चा
घुमता रहा रात भर |
आसमान में मां रोती
रही रात भर |..........

Wednesday, April 17, 2013


आईचं अंग गार गार

आई गेली आभाळाच्या पार ।

आईची मिठी सुटता सुटेना

प्राक्तनाचा चुडा फुटता फुटेना ।

आता येत नाही आईची हाक

सरणावर माझ्या बालपणाची राख ।

घरालाही आईचा होतो भास

वारा घेऊन पळतो मोगऱ्याचा वास ।

मृत्यूचा आक्रोश थांबता थांबेना

कावळ्याच्या वाट्याला मरणगंधाच्या यातना ।

Thursday, April 11, 2013





मां की साडी का कंबल ओढे
पडा रहता हुं ।
चांद ढुंढते राते कट जाती है ।
वो क़ब्खत चांद नजर नहीं आता ।
सुना है मेरे मां की गोद मैं 
आरामसे सो जाता है 
अब पुरा आसमां कंबल नजर आता है

Monday, April 1, 2013

एक एक करून सगळे निघून गेले 
हार गुंफत आणलाच होता सहज 

फक्त खाली गाठ मारायची तेवढी राहून गेली
रोज स्वच्छ आवरून नीटनेटका होऊन मी 
सकाळी आरशासमोर उभा असतो दिवसभर किती फ्रेश असतो आपण 

बरं झालं मन आरशात दिसत नाही ते
घरासमोरचा जुना वाडा पडून टाकला काल 
काही लोकं अजूनही माती उकरत होती .

ये ना ! आपल्या आठवणीचा हिशेब लावू या एकदा


 पहाटेची स्वप्नं खरी होतात हे ऐकून 
मीही आजवरच्या स्वनांचा हिशेब जुळवीत बसलो 


पण कधी नव्हे तो चंद्रच आला उलटतपासणी घ्यायला 
आज कधी नव्हे ते मुलाने फुगा आणुन द्या असा हट्ट केलाय ..

खिशात हात गेला तर खिसा रिकामा ! 

बाबा आज खुप आठवण येतेय तुमची.

Baba Tumchya karata !
बाईक वरून जाताना 
मोठ्याने शीळ घालत 
अथवा गाणी म्हणत, 
अंगावर बारीकशी धूळ उडू नये आणि 
जमलच तर दिखावुपणा 
म्हणून परिधान करतो .. 
आम्ही महागडी जाकेटस , टोप्या !
पण त्याच वेळी .. समोर धुळीने माखलेला लाल बावटा 
घेउन उभा असणारा एक छोटा मुलगा 
जेंव्हा.. त्याचा खेळ बाजूला ठेवुन ..
दिशा दाखवतो तेंव्हा
उन्हातान्हात सतत कष्ट करून 
आपल्याकरता रस्ता 
तयार करणाऱ्या या लोकांकरता माझा हात 
आपोआपच टाळी देण्याकरता पुढे येतो ! 
एका ठिकाणी ते कधीच थांबणार नाहीत ...
त्यांचा प्रवास चालुच.. असतो ....अखंड ....उन्हापावसात 
अश्वत्थाम्याप्रमाणे ते चिरंजीव आहेत की काय ..
आणि म्हणून आपण जिवंत आहोत की काय !!

For Leh Ladakh ! 
कारण तो असतो एक छायाचित्रकार .....
एक जादूचा खोका घेऊन ....
खाडकन जाग करतो ..तुम्हाला आम्हाला ...
आपल्याच स्वप्नातून ...
आपण जे स्वप्नात बघत असतो ... ते आपल्या समोर सहज मांडून ठेवत असतो ....
किंवा आपल्याला आता काय बघायला आवडेल ..
हे त्यानी आधीच बघून ठेवलेला असत ( का ?) .......
.. स्वप्नं दगा देतात आजकाल .......
कारण तो असतो एक छायाचित्रकार .. 
आम्हाला नुसतंच बघायला शिकवलेला असतं....
आणि त्याला ते आधीच दिसत असतं....
मग आमची वाट सोपी होते ... 
त्याचा हात धरून स्वप्नांपर्यंत जायची स्वप्न ...
पूर्ण वाह्यची शक्यता अधिक असते ..
कारण तो असतो एक छायाचित्रकार .. 
तो हे सगळं निस्वार्थ भावनेनं करत असतो ....
त्याच्या नव्हे तर आपल्या अस्तित्वाचा 
स्वार्थ म्हणून .....
कारण तो असतो एक छायाचित्रकार ..
रंग विकायला ठेवले आहेत ..
ऐकत नाहीत आजकाल 
वाहत जातात ...बेफाम ...
वळण न लावलेल्या मुलांप्रमाणे ..
बेशिस्त ...किंवा दिशाहीन 
भरकटणाऱ्या ..पतंगा प्रमाणे..
हात धरून नेतात मलाही ..
त्यांच्या बरोबर ..लांब .
सोबतीची भाषा करतात . ....
आणि माझ्या मागे ...माझाच 
दर आपापसात ठरवतात...
...रंग विकायला ठेवले आहेत ...
चित्र काढून रंगवलेले हात 
दाखवत नाही मी कोणालाच कारण ;
त्यावर होरपळेल्या बालपणीचे डाग 
अजून ओलेच असतात 
जात नाहीत कधी !
तुझ्या मिठीत अस्ताला जाणारा सूर्य
मला देऊन टाक ..
उजाडेल म्हणून भलत्याच दिशेला 
निघालो होतो .........
रस्त्यात अंधार हि झोळीत भरता येत नाही.
झोळी भरली की तुझा सूर्य तुला देऊन टाकीन.
तो पर्यंत माझ्या जखमा भरून येतील !
क्षणभर प्रेम केले इतुकाच 
माझा गुन्हा होता !
प्राक्तनाला अमुच्या भंगण्याचा शाप होता ?
वाहिली फुले 
तिच्या रिक्त ओंजळीत मी वाहिली 
न फुलण्याचा त्या निशिगांधलाच शाप होता ..
जायचे सोडून मजला 
हा गाव सोडून जायचे
वाटेत भोग सांडलेले
की जगण्याचा भास होता !
ताळा

रात्री जागून काढणं बरं नाही 
तो चंद्र ही नसतो आजकाल 
राहिलेल्या आठवणींचे काही 
तुकडे मोजत बसतो मग ..
ओंजळीत रहिलेली प्राजक्ताची फुले ..
काही स्पर्श ती विसरून गेलेली ..
थोडे भास ..
काही वायदे ..
काही श्वास ..मागे रेंगाळलेले ..
थोडा तिने गायलेला पुरियाही 
काही संध्याकाळ खोल उराशी जपलेल्या
मग जोडताना कळतं कि एखादा 
तुकडा तिच्याकडेच विसरला असेल का ?
म्हणून मग मी रोज रात्री 
पुन्हा पुन्हा मोजत बसतो ..
रोज रात्री .....

माझं प्रतिबिंब हरवलय
सगळं शोधून थकलोय
तुझ्या डोळ्यांना निमूट कबुल करायला सांग !




तळ्याजवळ तो चंद्र तुझी वाट बघत रेंगाळत उभा आहे 
तुझ्या करता मोत्यांचा हार घेऊन
चोरीचे डाग माझ्यावर पडलेत !
गुलाबी थंडीत सारं शहर 
धुक्याची चादर लपेटून 
पसरलं होतं ...
त्याची पावलं त्या जीवघेण्या थंडीत 
आसरा शोधत पुन्हा पुन्हा 
स्वतःची समजूत घालत होती...
सोबतीला त्याची चित्र 
ज्यांनी केली होती शेवटपर्यंत सोबत 
शेवटी त्यांनीच समजूत घातली 
एक एक चित्र जळत राहिल 
सुर्य ऊगवे पर्यंत .....
तुझा श्वास खोल रुतत 
चाललाय माझ्या श्वासात
सांभाळून ठेव आत्ताच 
नाही तर घुमत राहिल 
वावटळी सारखा 
तुझं अस्तित्व मी पुसून 
टाकल्याचा आरोप नकोय मला !












कल पुरी रात मां घुमती रही सडकोपर..बगल में रोटीयौ की टोकरी लेकर..सुबह मैने पुछा " मां कल रात भी चांद नाही मिला ना ?.कुछ टीमटीमाते तारे मेरे सामने रखकर बोली' .." ये ले तुझे खिलोने चाहिये थे न..."

01042013
......कारण मी चित्रकार आहे ...
माझ्या मेंदूतल्या रेषांचा आणि टिंबांचा हिशेब 
कागदावरच्या रेषांशी आणि टिंबांशी
जुळला अथवा नाही जुळला
तरी उमटणाऱ्या आकाराशी नाळ 
जोडून ठेवावी लागते 
माझ्या बेवारस असण्याचा हिशेब 
माझ्यापाशी असला तरी !




02232013