Wednesday, April 17, 2013


आईचं अंग गार गार

आई गेली आभाळाच्या पार ।

आईची मिठी सुटता सुटेना

प्राक्तनाचा चुडा फुटता फुटेना ।

आता येत नाही आईची हाक

सरणावर माझ्या बालपणाची राख ।

घरालाही आईचा होतो भास

वारा घेऊन पळतो मोगऱ्याचा वास ।

मृत्यूचा आक्रोश थांबता थांबेना

कावळ्याच्या वाट्याला मरणगंधाच्या यातना ।

No comments:

Post a Comment