Sunday, January 3, 2016

कल सारी रात तारे खेलते रहे आसमानभर
सहर आके देखता रहा..
असीर ( कैदी ) बनता एक तारा..
सहर ने रखे थे दो पेहरेदार
एक आफताब , एक माहताब अर्ज करता रहा इकरार देता रहा
मान लो जैसे छोटा बच्चा
कान धरे खडा है कोई.. आज दूर कही आसमान में
टीमटीमाता हुआ वो तारा
नजर आता है
सहर ने मेरी दो चार राते जो गिरवी रखी है..
बस सारी जिंदगी वो राते ढुंढते कट गयी नज्म अधुरी रह गयी
अर्धवट राहिलेल्या दोहांच्या ओळी
कानात सतत गुणगुणत असतात
एका पडक्या अवशेषा बाहेर ..
अडगळीत पडलेल्या कबीराला
मात्र त्याचे काहीही नसते ..
कदाचित विणले असतेही मी ते
अर्धवट धागे ...
पण पाठीमागच्या भिंतीवर लिहिलेले
ते मात्रांचे हिशेब ?
त्या वाळलेल्या रक्ताचे व्रण कबीराच्या पाठीवर
तसेच असतात.


आणि मी त्याच्या वेदनेचं ओझं घेऊन

भटकतोय रानोमाळ...
जणू एखादा शाप असल्या सारखा !

Friday, July 5, 2013

radha

ओली गच्च मिठी
जपून ठेव
बकुळीच्या फुलांचा
वास जपून ठेव
तळ्यापाशी गायलेला
मारवा जपून ठेव
मी असेन नसेन
त्या चंद्रासोबत
घेतलेल्या शपथा
जपून ठेव
तुझ्या करता
कृष्ण होणं मला जमला नाही
तू मात्र राधा होतीस !

Wednesday, July 3, 2013

Taswire


यें तस्वीरे बहोत हैरतजदा होती है 

, न आप मह्सुस कर सकते है 

न गले लगा सकते है 

'उनकी ' यादे दील के कोने में

चूपचाप पडी रहती है

लावारिस लाश कि तऱह

Tuesday, June 25, 2013

स्वतःच्या अस्तित्वाच्या शोधात


निघालेल्या मला


जेंव्हा तू एखादी लहानशी ठिणगी...


होऊन मिठीत घेतेस ..


त्या वेळेला माझ्या राखेतला


लहानसा कण बघून


कोणी ही सांगू शकेल

"काल इथे वणवा पेटला होता.."
अंगणातला मोगरा
अजून तसाच आहे
तू कधी गजरा वीणशील  नेम नाही
तू गेल्याचं सांगितलं नाही आहे त्या
दोन टपोऱ्या कळ्या कालच उमलल्यात
एकाच घरात दोन अनाथ नकोयत मला !
तुझं नसणं

मान्य करायला लावू नकोस !

हातानी माझीच राख

वेचायला लावू नकोस

चार फुले अश्रूंची वाहू देत मला

डोळ्यांना माझ्या

कोमेजायला लावू नकोस !

संपले बोलणेच अवघे

तुझी हाक शोधाया लावू नकोस !